Friday, 8 January 2016

घर म्हणजे काय असतं..?

घर म्हणजे मनातल्या कप्यातलं
सुंदर असं स्वप्न असतं,
जे ईच्छेच्या जमिनीवर उभं
राहण्यास सज्ज असतं।
      घर म्हणजे काय असतं.....!

नात्यांच्या भक्कम विटांवर
जे विश्वासानं उभं असतं,
त्याला प्रेमाच्या मुलाम्यानं
अधिक मजबूत केलं असतं।
      घर म्हणजे काय असतं.....!

गुळगुळीत दिसण्यासाठी
त्यावर समाधानाचं लिंपन असतं,
आनंद उत्साहाच्या रंगात
सुंदर असं सजलं असतं।
      असच आपलं घर असतं.....!

No comments: