Saturday, 25 June 2016

"वाह रे "जि.प." तुया कित्ती राज्या ताल"

*बदलीग्रस्त शिक्षक मिञांसाठी एक कविता सादर....!*

-किशोर तळोकार © 9673060762

"वाह रे "जि.प." तुया कित्ती राज्या ताल"

वाह रे "जि.प." तुया कित्ती राज्या ताल।
बिचार्‍या शिक्षकाचे होते कित्ती हाल॥

बदली बदली करत त्याच्या घरचे बदलुन गेले,
त्याचेच लेकरंबाय आता ओळखत नाही त्याले,
बदली आदेशाची वाट पहात निघून जाते साल।
वाह रे "जि.प." तुया कित्ती राज्या ताल....

आहे त्या शाळेसाठी त्यानं सारं रान जमा केलं,
शाळेत गुणवत्ता असावी म्हुन कंपुटर लावलं,
डिझिटल शाळेसाठी जमा कर गावातुन माल।
वाह रे "जि.प." तुया कित्ती राज्या ताल.....

शाळेसाठी कितीही कर कुणी ठेवत नाही मान,
जि.प च्या ह्या वाड्यात सारे हत्ती-घोडे समान,
ज्याचे चाले वाड्यात त्याचेच सलामत बाल।
वाह रे "जि.प." तुया कित्ती राज्या ताल.....

दरवर्षीचा बदली मेमो असते फुसका बार,
नेता आपली पोळी शेकण्या करतो हलके वार,
साध्या भोळ्या गुर्जींना ही कळली नाही चाल।
वाह रे "जि.प." तुया कित्ती राज्या ताल.....

बदलीच्या घोरात सारा जिव चिडचिड झाला,
अपडाऊनं करून आता खिसा रिकामा झाला,
घरापासुन दुर काढावे आणखी किती काल।
वाह रे "जि.प." तुया कित्ती राज्या ताल.....

जी आर फक्त कपाटासाठी राजकारण फक्त खुर्जीसाठी,
गुर्जी फक्त फळ्यासाठी अधिकारी फक्त फळासाठी,
बदलीच्या ह्या घोळक्यात गरजूची शिजत नाही दाल।
वाह रे "जि.प." तुया कित्ती राज्या ताल.....

_दि. २४.०६.१६; वेळ- ११.४५ वा._

No comments: