Thursday, 30 June 2016

सुखाचा खास झालो...!

कधी दुःखाचा दास झालो,
कधी सुखाचा खास झालो।

तिच्या मनाची हाक आली,
तिचा अखंड श्वास झालो।

ति जीवनाची  साक्ष आहे,
तिचा पक्का वीश्वास झालो।

कधी तिच्या स्वप्नात गेलो,
कधी तिचा आभास झालो ।

जीणे जरा कठीण होते,
आता कुणाची आस झालो।

        - किशोर तळोकार  (दि. 30.06.16)

No comments: