Friday, 1 July 2016

लोटा

लोटा

पाह्यटी पाह्यटी सखाराम उठून उभा झाला,
डोये चोयत ईकडे तिकडे पयाले लागला ।

बुडी पाह्य पोट्टे पाह्य बायको पाह्यत राह्यली,
बुडा म्हणे ह्याले चीभीन कोण्ती भुतीन झोंबली.?

बह्याळ झाला काबे सख्या सरका सुदा राह्यनं,
चार पोराचा बाप झाला आता तरी सुदरनं।

सख्या झाला कावराबावरा त्याले काई सुचेना,
धोतर गेलं सुटून काष्टा काई सापडेना।

"अवं कशे हाय तुमी," बायको म्हणे त्याची,
चार चौघात दाकवता झाकली मुठ लाखाची।

अवं शेद्र हाय ना त्याले हातानं तरी झाका,
सारं चिञ ईचिञ हुईन जास्त नको वाका।

अवं जणे तुमी सारे पिसाट हाय.! समजता काय मले.?
तव्वा पासुन जोर्रात लागली सांगू मी कुणाले।

जास्त वेळ नई आता, लव्वकर दे मले लोटा,
अाखिन वेळ लागला तं, तुलेस ईचार पडंन मोठा।

- किशोर तळोकार दि. १ जुलै १६

No comments: