Sunday, 5 November 2017

शिक्षणातलं नव संजीवन ज्ञानरचनावाद..!

📕📙🔅  शिक्षण समिक्षा  🔅📙📕 
     भारतीय शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक प्रश्नांचे मूलगामी विवेचन करणार्या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेला लेख..*

🏀 शिक्षणातलं नवसंजीवन ज्ञानरचनावाद!

_नक्की वाचा_ 👉🏻👉🏻👉🏻

शिक्षणातलं नव संजीवन ज्ञानरचनावाद..! - किशोर तळोकार

     आज पर्यंत शैक्षणिक क्षेत्रात झालेले बदल यथाकाल यशस्वी ठरले असे म्हणता येणार नाही. मात्र बदल सातत्याने घडत गेले. परंतु सध्या शिक्षणात जो बदल होत आहे तो गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने होत आहे. वर्षानुवर्ष असमाधान असलेल्या आपल्या शिक्षणात समाधानाचे सूर शिक्षकांना गवसायाला लागले आहेत. ज्ञानरचनावाद पद्धतीने आज होणारी शैक्षणिक सुरवात
उद्याची यशस्वी शैक्षणिक वाटचाल आहे. देशामध्ये एखादी नवी शिक्षणदिशा आग्रहाने प्रदिपादन केली, धोरणात ती मांडली कायद्यात ती आणली कि मुख्य काम उरते ते समाजाने हे सारे जाणून घेण्याचे आणि संबधीतानी ते आपल्या दैनंदिन जिवनात उतरवण्याचे. हे काम जेवढ्या त्वरेने जेवढे जाणीवपूर्वक, जेवढे प्रभावी रीतीने होईल तेवढे नवे शिक्षण जुन्या शिक्षणाच्या जागी येऊन बसेल. जेथे जेथे नवे रचनावादी शिक्षण व्यवहारात येईल तेथे तेथे शिक्षण बदलाची सुरुवात होणार  आहे.
        पारंपारिक शिक्षणरचनेवर प्रामुख्याने वर्तनवादी विचारसरणीचा प्रभाव होता. वर्तनातील अपेक्षित बदल म्हणजे शिक्षण व्याखेवर उभी राहिलेली आपली शिक्षण व्यवस्था व्यक्तीभिन्नता व प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगवेगळी असते. याचा जराही विचार न करणारी वाटते. विद्यार्थ्याची विकासाची अवस्था वयोगट त्याची सामाजीक शारीरिक मानसिक गरज काय?  याचाही विचार न करणारी  होती. विषयाचा  ठराविक अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करायचा व शेवटी लेखी परीक्षा घेऊन गुणाची प्रत ठरवायची हे वर्षनुवर्ष चालत आहे. माहिती संकल्पना याच्या आकलन पेक्षा थोडा काळ स्मरणात ठेऊन परिक्षेचा वापर रेचक  म्हणून होणे. हि या शिक्षण व्यवस्थेची वैशिष्ट्ये होती. औपचारिक शिक्षण घेऊन पदव्या घेऊन बाहेर पडणारा  प्रत्येक विद्यार्थी  जीवनांतील समस्यांना सकारात्मक पद्धतीने तोंड देऊ शकेल ? समस्या निवारण, निर्णयक्षमता, बहुदिश पद्धतीने विचार नवनिर्मिती अशा जीवण कौशल्याने परिपूर्ण झाला असेल. असे शिक्षण त्याला मिळत होते का? याचे उत्तर नकारात्मकच द्यावे लागेल. शिक्षणाने विद्यार्थाचा व्यक्तिमत्वाचा विकास घडवायचा आहे जिवनकौशल्ये, मूल्ये, गाभाभूत घटक रुजवायचे असतील तर ज्ञानरचनावाद शिक्षणपद्धतीला पर्याय नाही. मुलांची शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया शिक्षण क्षेत्रात नवसंजीवनी देणारी आहे. यात तिळमात्रही शंका नाही.
         बालकाचा ज्ञान, क्षमता व बुद्धिमत्ता याचा विकास साधावा तसेच बालकाच्या मानसिक व शारीरिक शक्तीचा पूरेपूर विकास व्हावा अशी काही उद्धीष्ट्ये ज्ञानरचनावाद पद्धती मध्ये आहेत. रचनावादी दृष्टीकोन आत्मसात केला की, शिक्षक म्हणून आपली मानसिकता बदलण्याची सुरवात होते. आपल्याला वर्तनवादी शिक्षणा कडून रचनावादी शिक्षणाकडे जायचे आहे. दैनदिन शालेय व्यवहारात नव्या वाट निर्माण कार्याच्या आहेत. त्यासाठी काय करावे लागेल? वर्गातील शिक्षण व्यवहार कसा बदलावा लागेल ? विद्यार्थीकेंद्री व्यवस्थेत वर्गातील शिक्षणात शिकविण्याकडून शिकण्याकडे जायचे आहे. इतके दिवस शिक्षक शिकवतात म्हणून विद्यार्थी शिकतात अशा भ्रामक कल्पनेत आपण जगत होतो. निसर्गतःच माणसाला कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रीये प्राप्त झाली आहेत. त्यांच्या सहाय्याने बाहेरील जगाचे आकलन करून घेण्याचा मेंदू प्रयत्न करीत असतो. शिकणे हे नैसर्गिक आहे. मुलांना सारखे शिकवायचे नाही तर शिकू द्यायचे आहे. वर्गातील शाळेतील सर्व रचना व्यवस्था, वातावरण शिकण्याच्या अंगांनी तयार करावयाचे आहे. यालाच विद्यार्थी केंद्रित व्यवस्था म्हणतात.
        जीवन हेच शिक्षण आहे तेंव्हा पाठ्यक्रम हा व्यक्तीमत्वाचा जडण घडणे मध्ये एक मार्गदर्शक स्वरुपाचा असायला हवा. प्राथमिक शिक्षणावर आतापर्यंत परिक्षा व मुल्यमापनाचा दंडक होता. त्यामुळे क्षमतेचं दृढीकरण व्हावे तसे झाले नाही. त्याचा परिणाम उद्दीष्टाप्रत पोहचण्यात प्रशासन व शिक्षक अपयशी ठरले. आज ज्ञानरचनावाद हा सर्व अडचणींवर पर्याय मिळाला. अनेक संबोध हे विद्यार्थ्याच्या पुर्वानुभवावर आधारीत अनुभव देण्याचे प्रयोग यशस्वी ठरत आहे. विज्ञान व भुगोलाचे धडे हे पण एक सुंदर प्रायोगिक पध्दतीने वा कृतीयुक्त शैक्षणिक साहित्यातुनमाॅडेल्स मधुनही देता येत आहे. इतिहास हा कथाकथनाच्या माध्यमातुन,चिञपटातुन रुजवला जात आहे. इतर कलाकार्यानुभव,शारिरीक शिक्षण हे प्रात्यक्षिकाद्वारे व सर्व विषयाचे दिवसागणिक एकसुञ पध्दतीने नियोजन करता येत आहे. सोबतच महत्वाचे असे कीकुठलाही विषय रुजवतांना विद्यार्थ्यांचे समाजातील प्रत्येक घटकाशी त्याच्या कृतीचे आदान प्रदान व्हायला हवे. त्याला मिळणार्या सामाजिक आंतरक्रियेतुन ज्ञानाची निर्मिती करता येईल. शाळेची मर्यादा शिक्षक-शाळेची इमारत-शालेय परिसर एवढीच पुरेशी नाही तर ती सर्वञ असावी. शिक्षणाच्या वाटा अनेक आहेत फक्त त्या शोधाव्या लागतील. अशाच शिक्षण प्रक्रियेतुन मुलांना परिक्षार्थी वृत्तीतुन काढुन माणुस म्हणुन घडण्याच्या प्रक्रियेमध्ये आणता येईल. शिकविण्याच्या प्रक्रियेतुन शिकण्याच्या प्रक्रियेत आणता येईल. ज्ञानरचना वादाचे खरे फलीत  "स्वानुभवातुन शिक्षण" ह्यातच आहे.विद्यार्थी स्वानुभावतुन शिकत असतो कारण शिकणे ही स्वतंत्र प्रक्रिया आहे.
      "विद्यार्थीधिष्टीत असेे स्वतंञ कृतीयुक्त अनुभवपुर्ण" कार्यक्रमातुन शिक्षण मिळावे व शिक्षकांना पुरेसा वेळ देउन अध्यापणाचे पुर्ण स्वातंञ्य द्यावे असे अपेक्षित आहे. शिक्षणाने एक सुजाण व समजदार माणुस घडला तरच शिक्षणाचे यश समजावे व त्यालाच सुशिक्षित हा शब्दही शोभेल असे वाटते.

लेखक- किशोर तळोकार, 9673060762
केॆद्रिय सहसचिव शिक्षक साहित्य संघ महा.राज्य
जिल्हाउपाध्यक्ष म.रा.शिक्षण परिषद (प्रा.) यवतमाळ
(विषय शिक्षक) जि. प व.प्रा.म. शाळा उचेगाव पं.स.दारव्हा

No comments: