सरी.....//////
सरसरणार्या सरी,
येती माडावरी।
गडगडणार्या नभी,
नाव पावसाची उभी॥
किलबीलाट पक्षांची,
मौज आहे भिजण्याची।
भटक्या गुरांच्या मनी,
येतो आठवणीत धनी॥
वाट आहे तेच जुनी,
पण आता दाविल ती कुणी।
धडधड दाटली उरी,
कधी सरणार ह्या सरी॥
धारा वाहते नाल्यावरी,
नदी नेते त्यास दुरवरी।
बळीराजा कुरकुर करी,
तरी येतात सरीवर सरी॥
झाकाळलेल्या आकाशी,
पाहुन पक्षी जाती पिलाशी।
मुसळधार त्या सरी,
धरणीची ती तहान खरी॥
भागविल ती पुरी,
व्याकुळता आहे तिची जुणी।
अखेर त्या सरी दमल्या,
जणु गेल्या निघूनी॥
लख्ख प्रकाश चहू दिशांनी,
जणु न्हाहली अभ्यंग ही धरणी।
स्वच्छ निरभ्र ह्या आकाशी,
पुन्हा याव्या सरीवर सरी
सरीवर सरी....॥
- किशोर तळोकार
सरसरणार्या सरी,
येती माडावरी।
गडगडणार्या नभी,
नाव पावसाची उभी॥
किलबीलाट पक्षांची,
मौज आहे भिजण्याची।
भटक्या गुरांच्या मनी,
येतो आठवणीत धनी॥
वाट आहे तेच जुनी,
पण आता दाविल ती कुणी।
धडधड दाटली उरी,
कधी सरणार ह्या सरी॥
धारा वाहते नाल्यावरी,
नदी नेते त्यास दुरवरी।
बळीराजा कुरकुर करी,
तरी येतात सरीवर सरी॥
झाकाळलेल्या आकाशी,
पाहुन पक्षी जाती पिलाशी।
मुसळधार त्या सरी,
धरणीची ती तहान खरी॥
भागविल ती पुरी,
व्याकुळता आहे तिची जुणी।
अखेर त्या सरी दमल्या,
जणु गेल्या निघूनी॥
लख्ख प्रकाश चहू दिशांनी,
जणु न्हाहली अभ्यंग ही धरणी।
स्वच्छ निरभ्र ह्या आकाशी,
पुन्हा याव्या सरीवर सरी
सरीवर सरी....॥
- किशोर तळोकार
No comments:
Post a Comment