Friday, 8 January 2016

असेच असावे माणसाने.!

असेच असावे माणसाने.!

ह्या भुतलावर ज्ञानाचे अस्तित्व सांगावे माणसाने,
निसर्गाचे त्याचे निकटचे नाते जपावे माणसाने।

माणसाचे माणसाशी असेल ते नाते जगावे माणसाने,
समाजाच्या उपकाराचे ऋण नेहमी स्मरावे माणसाने।

माणुस म्हणून जगतांना समानतेचे भान ठेवावे माणसाने ,
पापपुण्याच्या पलीकडचा धर्म सांगावा माणसाने।

आत्मविश्वासाच्या शस्ञाने अनेक आव्हाने पेलावे माणसाने ,
निसर्गाच्या मैञीचा ईतिहास सदैव रचवा माणसाने।

कर्तव्याचे अनेक कृत्य सदा घडवावे माणसाने ,
धर्माच्या नियमांच्या नित्य पालन करावे माणसाने।

परमात्माही शोधेल आपले निवास माणसात,
असेच आचरण असावे आजच्या माणसाचे।

- किशोर तळोकार 

No comments: