बहर तुझ्या प्रेमाचा..
गं सखे माझ्या .! तुझ्यात असा गुंतलो।
मोहरलो मी बहरलो,
सर्वञ मी तुला शोधतो,
आर्त माझी हाक गं, तुझ्यात असा गुंतलो।
धडपडतांना सावरलो,
गडबडतांना आवरलो,
व्याकुळ माझे ह्रदय गं, तुझ्यात असा गुंतलो।
स्पष्ट होतांना बावरलो,
व्यक्त होता होता राहिलो,
गोंधळात मी आहे गं, तुझ्यात असा गुंतलो।
अहोराञ स्वप्नात जागतो,
तुझ्याच रंगात रंगतो,
डोळ्यात सखे तुच गं, तुझ्यात असा गुंतलो।
सुखात तुलाच पहातो,
दुःखात तुला शोधतो,
भटकत राहिल माझे मन गं, तुझ्यात असा गुंतलो।
प्रेमाचा अर्थ मी जाणलो,
धन्य हे जीवन आता मानतो,
अर्थपूर्ण हे प्राण गं, तुझ्यात असा गुंतलो।
-किशोर तळोकार
गं सखे माझ्या .! तुझ्यात असा गुंतलो।
मोहरलो मी बहरलो,
सर्वञ मी तुला शोधतो,
आर्त माझी हाक गं, तुझ्यात असा गुंतलो।
धडपडतांना सावरलो,
गडबडतांना आवरलो,
व्याकुळ माझे ह्रदय गं, तुझ्यात असा गुंतलो।
स्पष्ट होतांना बावरलो,
व्यक्त होता होता राहिलो,
गोंधळात मी आहे गं, तुझ्यात असा गुंतलो।
अहोराञ स्वप्नात जागतो,
तुझ्याच रंगात रंगतो,
डोळ्यात सखे तुच गं, तुझ्यात असा गुंतलो।
सुखात तुलाच पहातो,
दुःखात तुला शोधतो,
भटकत राहिल माझे मन गं, तुझ्यात असा गुंतलो।
प्रेमाचा अर्थ मी जाणलो,
धन्य हे जीवन आता मानतो,
अर्थपूर्ण हे प्राण गं, तुझ्यात असा गुंतलो।
-किशोर तळोकार
No comments:
Post a Comment