<<<<<{ तुझी भेट }>>>>>
खडतर तो प्रवास,
नागमोडी ती वाट,
तुला भेटण्याची आस,
मनात होती दाट,
बेभान वार्यासवे मग तुला भेटण्यास मी निघालो।
तुच तहान डोळ्यांची,
तुच दवा प्राणाची,
ओढ तुला बघण्याची,
गती तुच ह्रदयाची।
ह्रदयातील भावनांच्या कळी फुलवण्यास मी निघालो॥
काया माझी गळाली,
ह्रदय गती वाढली,
वाचा माझी थरथरली,
अबोल जिव्हा बोलली।
असे बघुन तुला निरुत्तर, निशब्द मी जाहलो॥
कंठ दाटुन येतो,
अपुर्ण त्याच भावणा,
फक्त अश्रुपुर वाहतो,
अबोल दोघेही त्या क्षणाला। म्हणतात आणखी थोडं थांबणा.!
भेट अस्तास येतांना विरहाच्या वाटेवर मी निघालो॥
- किशोर तळोकार

No comments:
Post a Comment