Friday, 15 July 2016

का मन हे..!

का मन हे..!

का मन हे वेडे पिसे तुझ्यासाठी झुरते,
का मन हे लाडी गोडी तुझ्याशीच करते ॥धृ॥

पावसाच्या थेंबात तु,
हवेतल्या गारव्यात तु।
दुरून येता आभास तुझा,
मन पाखरू उडू लागते॥

का मन हे वेडे पिसे तुझ्यासाठी झुरते,
का मन हे लाडी गोडी तुझ्याशीच करते ॥धृ॥

पाखरांचे लागे थवे उडू,
भेटायची लागे वेळ टळू।
पदर तुझा हवेत उडता,
वर खाली जीव करते॥

का मन हे वेडे पिसे तुझ्यासाठी झुरते,
का मन हे लाडी गोडी तुझ्याशीच करते॥धृ॥

उरातल्या गर्भात तू,
माझ्यातल्या श्वासात तू।
मन तळ्यातला मासा झाला,
तुझ्या प्रेमात पोहायला करते॥

का मन हे वेडे पिसे तुझ्यासाठी झुरते,
का मन हे लाडी गोडी तुझ्याशीच करते॥धृ॥

- किशोर  तळोकार [२ जुलै १६]

No comments: