Wednesday, 27 July 2016

पाऊस माझ्या मनाचा

पाऊस माझ्या मनाचा 

पाऊस माझ्या मनाचा असा बरसतो आहे,
हरवलेल्या पाखरांना पुन्हा शोधतो आहे।

पाऊस माझ्या मनाचा असा बरसतो आहे,
एकाकी मनातला कप्पा जसा खवळतो आहे।

पाऊस माझ्या मनाचा असा बरसतो आहे,
दुभंगलेल्या नात्याला पुन्हा जोडतो आहे।

पाऊस माझ्या मनाचा असा बरसतो आहे,
अन्यायाला तिव्र वाचा जसा फोडतो आहे।

पाऊस माझ्या मनाचा असा बरसतो आहे,
ह्या जातीय दंगलांवर जसा गरजतो आहे।

पाऊस माझ्या मनाचा असा बरसतो आहे,
त्या रूसलेल्या फुलांना पुन्हा हसवतो आहे।

पाऊस माझ्या मनाचा असा बरसतो आहे,
गंजलेल्या शरीराला पुन्‍हा झिजवतो आहे।
-किशोर तळोकार 9673060762
दि.27.07.16

No comments: