Saturday, 30 July 2016

"स्वप्नात तुझी भेट..

"स्वप्नात तुझी भेट.....

स्वप्नात तुझी भेट जेंव्हा होते,
मन वेडे पिसे नाचू लागते !! धृ !!

सारी बंधने तोडायची आता,
रीती पातीच्या अटी नाही आता, -2-
तु हसतेस जेंव्हा गालामध्ये,
मन वेडे पिसे नाचू लागते ।।

जगायला जीवन फार नाही,
करू असे की जग नाव घेई,-2-
लट तुझी जेंव्हा उडू लागते,
मन वेडे पिसे नाचू लागते ।।

नात्यामध्ये दुरावा ठेवु नाही,
विश्वासाला तडा ना देऊ कधी,-2-
पलटुन जेंव्हा अशी बघते,
मन वेडे पिसे नाचू लागते ।।

स्वप्नात तुझी भेट जेंव्हा होते,
मन वेडे पिसे नाचू लागते !! धृ !

किशोर तळोकार

No comments: