गणपती उत्सवातून सामाजिक ऐक्य व पर्यावरण संरक्षण होणे काळाची गरज..!
-किशोर तळोकार, ९६७३०६०७६२
महाराष्ट्रात हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो. राज्यातील भव्योत्सवात गणेशोत्सव हा प्रथमदर्शनी आहे. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ दर चार वर्षांनी साजरे होणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले होते. याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते. एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा. इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटले की, स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवेच त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला आणि त्यातुन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज गणेश उत्सवाला वेगळेच रूप आलेले आपल्या लक्षात येते. आज फक्त भंपकपणाला ऊत आलेला दिसुन येतो. मोठ्या शहरापासुन ते गल्ली बोळापर्यंत गणेश मंडळांचा महापुर दिसुन येतो. चार पाच लोकांचा समुह जुळतो आणि गणपती बसवून आपल्या धार्मिक भावना कर्कश रुपात मांडतांना दिसतात. त्यात काही आदर्श मंडळही आपल्या शिस्तीचा परिचय देऊन जातात माञ अशी संख्या मोजकीच आहे. आपली धार्मिकतेत वर्चस्वाचा आवेश उमटतांना सेक्युलरांना निदर्शनात येतांना दिसतोय तो दिसु नये एवढीच अपेक्षा..! एका गावात दहा मंडळे असतील तर तेथे भक्ती बाजूला राहते आणि स्पर्धा सुरु होते. स्पर्धा सुशोभणाची, मुर्तीच्या देखाव्याची, अमाप खर्च करण्याची, प्रसिद्धीची...! ह्यात भक्तीचा फक्त आव बाकी शुन्य. मग कसा होईल एकोपा..? मोठमोठ्या आवाजाने केलेला ध्वनीशोर, विजेचा प्रचंड वापर. आणि मिरवणूकीतुन केलेला गगणभेदी गुलालधुर, मद्यधुंद कार्यकर्तेे, पोलिसांचा बंदोबस्त. काय खरच बाप्पांना असचं अपेक्षित आहे...? हा श्राध्दिक प्रश्न मनात येवुन जातो. जिथे शेतकर्याची दैनावस्था आहे, अनेक भुकबळी आहेत. तिथे ही पैशाची होणारी उलाढाल चिंतनीय आहे.
सन १८९३ पासून पुण्यातील सर्व गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे. एक आदर्श असा की, मागिल वर्षी पुणे आणि पिंपरी-चिंचवड़ मनपा येथुन मोठ्या संख्येत मुर्ती विसर्जन नद्यांमध्ये करण्याऐवजी मूर्ति दान दिल्या गेल्या. पुण्या मध्ये ही संख्या २०,०७५ होती तर पिंपरी-चिंचवड़ मध्ये २०,७९४ गणेश प्रतिमा दान केल्या गेल्या. विसर्जन घाटी वर मनपा कर्मचारी नियुक्त केल्या गेले. त्यामुळे पर्यावरनाची प्रचंड होणारी हानी वाचली.
विसर्जन करतांना जलाशयात होणारे पी ओ पी मुळे होणारे प्रदुषण व त्यातुन होणारी जलसजीवांची हानी हे कसे थांबवता येईल.? ह्यावर विचार व्हायला हवा. ईको फ्रेंडलीचा वापर व्हायला हवा. त्यासाठी एक गाव एक गणपती ही योजना राबवायला हवी. तर खुप काही बदल घडून येऊ शकतो. एकाच ठिकाणी जमणारा समुह, सर्वांचा सहभाग, प्रसंगी समाजोपयोगी कार्यक्रमांद्वारे लोक प्रबोधनही होईल. ह्यावर वाचकांनी चिंतन केले तर लेखाचे सार्थक झाल्याचे समाधान होईल. कारण ही आजच्या काळाची गरज झाली आहे.
=================================

2 comments:
Agreed on your view.....
@Gajanan Raut sir thanks a lot
Post a Comment