Tuesday, 10 February 2015

कविता-मी मास्तर हुईन कावो.!!

मी मास्तर हुईन कावो..!!

भल्या मोठ्या कष्टानं
म्या डियड केलं व्हतं,
हुईन मी मास्तर मुन
लै भारी वाटत व्हतं,
लै जोमाची तयारी करुन
मी परिक्षेले गेलो,
पेपर लै झ्याक गेला भल्ला
रंगात आलो,
लगे येतो मीरीट आता
मायले सांगुन ठिवलं,
प्रयत्नांती परमेस्वर फळ मिळते
असं व्हतं आयकल,
अन काय सांगु राज्या
तसचं झालं व्हतं,
सबंद पोट्टेय मदुन
मीच पयला आलो व्हतो,
तवा हातपाय माये राज्या
गगनालेच पोचले व्हते,
आजी सांगे मया मायले आता
मास्तर तुया लेक व्हते.
आजी सांगे मया मायले आता
मास्तर तुया लेक व्हते.  !!!

किशोर तळोकार
दि. 10/02/15 वेळ 6.55 pm

No comments: