"काय सांगु राज्या लै पयजामा झाला.!!"
भल्या मोठ्या कष्टानं म्या शिकशन केलं व्हतं,
नऊकरी लागते मुन लै जिद्दीनं पेटलो व्हतो,
परीक्षा देवुनशान निकालाची वाट पहात व्हतो,
लै देव पावला राज्या सगल्याई मदुन मीच पयला व्हतो,
निकालाचा कागुद घेउन सारा गाव जमा केला,
अन,गावातल्या रिकाम टकलैनं माया खिसा खाली केला,
तिकुन आलो घरी माय मने हे तं होतच रायते,
अन वासरै मदी बी लंगडी गाय शायनी रायते,
तीच्या बोलन्या मदीबी लय अभिमान व्हता,
संबंद गावामदी आता मयाच डंका व्हता,
फारम भरता भरता बरेचं दिवस निघुन गेले,
काॅलची वाट पायता पयता घरचे सारे इरुन गेले,
तवा काई दिसानं एक पोस्टमन आला,
अन काय राज्या लई लई लई झ्याक झालं व्हतं...!
तो काॅल लेटर देवुन लय खुशी देउन गेला,
मया मायनं ह्याचा बी लय गाजावाजा केला,
बाबा मया देवळा मदी किलोभर पेडा घेवुन गेला,
आता सारं झ्याक झालं व्हतं राज्या..!
पण लय पयजामा झाला..!
अश्शी अल्याळ पल्याळ लागली नवकरी मले,
का राज्या मी झुरो घराले अन घर मले झुरे,
शाळेमंदी पोट्टे पायले तं खंडी भर व्हते,
मी धरुन मास्तर तिथं आणखी कुणी नोते,
वाटे राज्या मले माया लय चांगला टायम आला,
अन काय सांगु राज्या लय पयजामा झाला,
मी मनो एक...पोट्टे मने तुच देक...
म्याबी टाकला दम ! मटलं शफारले काबे पोट्टेहो..!!
तं मने सांगा ना गुरुजी कवा व्हते ब्रेक...
निवड कोंबडी बाजाराचा चिंदी बाजार झाला,
काय सांगु राजा लय पयजामा झाला,
लई दिवसानं आज गली मे चांद निकला,
के.प्र.सायब येत हाय सांगे मास्तर टकला,
सायब येते मुन पोट्टे झ्यांड करून ठेवले,
अन मस्टर वर सायन करुन सायब आले तसे निगुन गेले,
सार्या मेहनतीवर सायब माया पाणी फिरुन गेला,
अन काय सांगु राज्या लय पयजामा झाला,
पोट्टेईले काई येत नई अन दुसरा मास्तर देत नई,
असचं सुरू रायलं तं गुणवत्ता वाढल्या बिगर रहात नाई,
पोट्टे मने गुरूजी शिकवनं बंद करा आता लै भुक लागली,
झिंगा बाई आज आली नवती
खिचडी शिजवा लागली,
बेकार बरा होतो राजा फुकट पसारा केला,
अन काय सांगु राज्या लय पयजामा झाला,
हे मिटींग, ते परिशिकशन,दे सर्वेकशन,मग इलकशन,
पुरा क्षण क्षण क्षण माया झिंग निगुन गेला,
आता बदलीची वाट पायत पूरा जीव तजुन गेला,
जिपनं मले राज्या सांदोसांदी असा झुलवुन घेतला,
काय सांगु राज्या तुले लय पयजामा झाला..!
--- किशोर तळोकार
9673060762
दि. 11/02/15
वेळ 11.11pm

2 comments:
bhau aaj yogayogane tumacha payjama pahyala mhanaje vaachala ,lay bhari rao,vachun mahya pan paayjama zala shailesh kale
माहोल
Post a Comment