शोधतो मी.....!
----------------------------------🇰 🇹 🇦 🇱 🇴 🇰 🇦 🇷
9 6 7 3 0 6 0 7 6 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ती आश्वासने खोटी,
स्वभाव नाटकी ते,
स्वार्थी जगात अशा,
माणुस शोधतो मी।
मैञी एक दिखावा,
कामापुरते दोस्तं,
दोस्तीच्या ह्या कट्यात,
ते मिञ शोधतो मी ।
खोटी होती ती माया,
ताकापुरता मामा,
सुखी कुटुंबात ह्या,
ते नाते शोधतो मी ।
जाळ्यात समस्यांच्या,
रोज गुदमरणे,
सुखाच्या वाटेवर,
तो श्वास शोधतो मी ।
धावपळीच्या जगी,
विखुरलेले लोकं,
जीवनात ह्या आता,
जगणे शोधतो मी ।
-किशोर तळोकार
दि. ९.१२.१५
www.kishortalokar.blogspot.in
No comments:
Post a Comment