Friday, 22 January 2016

सामाजिक भान

-----▫🔹सामाजिक भान🔹▫-----
🔻➖🔻➖🔻➖🔻➖🔻 🔻➖🔻➖🔻➖🔻➖🔻
..... दिवा होऊन स्वतः जळून प्रकाश देण्याची वृत्ती प्रत्येकांमध्ये आली तर कुणीही असाह्य, निराधार स्थितीत राहणार नाही. आपल्या जन्माला सिध्द करण्यासाठी आपल्याला समाजाचे ऋण हे फेडावेच लागेल...! मी, माझं कुटुंब, पैसा, संपत्ती एवढचं आपल अस्तित्व नाहीए...! हेच जीवन नाहीए..आपल्या समवेत ईतरांचेही अस्तित्व आहे ह्याची जाण व्हायला पाहिजे. आपले आयुष्य कळत न कळत अप्रत्यक्ष पणे कुणीतरी सुकर सहज करत असतो. तेंव्हा प्रत्येकांप्रती आपलं काही देणं लागतं..ह्याचा विचार व्हायला हवा..! समाजामध्ये, कुटुंबामध्ये आपल्या वरिल लोकांचा विश्वास कायम ठेवणे ह्यातच खरी कसोटी असते कारण, " वि श्वा स "
किती हा छोटा शब्द आहे, वाचायला सेकंद लावतो, विचार करायला मिनीट लावतो, समजायला दिवस लावतो
आणि सिध्द करायला संपूर्ण आयुष्यचं लावतो.
     समाजसेवा करायला कुणाकडे वेळ आहे.? माझ्या मुळे काय जग बदलणार..? असा विचार करत जगत राहीलो तर भुतकाळाचा ञास, वर्तमानाचा विरोध आणि भविष्याची व्यर्थ चिंता करण्यापलीकडे आपल्याजवळ पर्याय उरणार नाही. त्यामुळे आपले कुटुंब सांभाळून शक्य तेवढा वेळ कुठल्याही सामाजिक चळवळी दिला तर आयुष्य समाधानाचे व सन्मानाचे जाईल. ह्याची मला खाञी आहे. एखादी गोष्ट आपण करून पाहत नाही. तो पर्यंत ते अशक्‍यच वाटत राहते. प्रवाहाबरोबर वाहत जाणं फार सोपं असतं, पण आपली वाट एकट्याच्या बळावर चालायला धैर्य लागतं. आपली खरी संपत्ती पैशांमध्ये नव्हे तर आपल्या शय्येवर येणार्या व आपल्याला खांदा देणारे हातांच्या संख्यावरुन ठरवायची असते. कारण पैशापेक्षा तुम्ही किती माणसं कमावलीत त्यावरुन तुमची श्रीमंती ठरते..!
असो,
....मी फक्त एक माझ्या मनातली तळमळ व्यक्त केली.
शेवटी........
"जीने का अंदाज अपना अपना."
✒किशोर तळोकार 9673060762
जिल्हाध्यक्ष यवतमाळ
शिक्षक साहित्य संघ (महा.राज्य)

No comments: