टोबणी (पेरणी)
(अष्टाक्षरी)
झाली टोबणी सुरू गं,
जीव खाली वर करी ।
पावसाच्या आशेवर,
माह्यी जिंदगानी सारी ॥
कधी उभारेल पीक
कधी बहरेल शेत ।
दाणा मागतो फकीर,
कधी कणसाचा बेत ॥
सारं हिरवं दाटलं,
कधी आभाळ फाटलं।
दोन घास पोटासाठी,
आम्हां राबत्या मिळलं ॥
देवा तुह्या देव्हार्याची,
सर कुठे रं येईल ।
हात जोडतो येथून,
मग पंढरी येईल ॥
*किशोर तळोकार* ©
दि.22.07.16 वेळ 6.12 मि
(अष्टाक्षरी)
झाली टोबणी सुरू गं,
जीव खाली वर करी ।
पावसाच्या आशेवर,
माह्यी जिंदगानी सारी ॥
कधी उभारेल पीक
कधी बहरेल शेत ।
दाणा मागतो फकीर,
कधी कणसाचा बेत ॥
सारं हिरवं दाटलं,
कधी आभाळ फाटलं।
दोन घास पोटासाठी,
आम्हां राबत्या मिळलं ॥
देवा तुह्या देव्हार्याची,
सर कुठे रं येईल ।
हात जोडतो येथून,
मग पंढरी येईल ॥
*किशोर तळोकार* ©
दि.22.07.16 वेळ 6.12 मि

No comments:
Post a Comment