- किशोर तळोकार ९६७३०६०७६२
[दै. पुण्यनगरी- youthबुक मंगळवार २८ मार्च १७]
"ये दुनियाँ ये मेहफिल मेरे काम की नहीं..." असं गुणगुणत काही लोक आपलं आयुष्य जगत असतात. आणि मनाशी करार करुन टाकतात की, मला कुणाशीही बोलायचं नाहीए.!, मला कुणालाही माझ्या मनातलं सांगायचं नाहीए. कारण कुणी मला समजूनच घेणार नाहीए.! मग सांगुन काय उपयोग. असा गैरसमज होण्यासारखी परिस्थिती आज प्रत्येक कुटुंबात व समाजात पहायला मिळते. त्यामुळे अशा व्यक्तींना "भिड मेभी तनहा.." असण्याचा कटु अनुभव नेहमीच येत असतो. का आले असेल असलं एकाकी पण लोकांच्या आयुष्यात...कधी विचार केलाय ? नाही ! केलाही असेल पण त्याच्या मुळाशी गेले नसाल. म्हणुन आज समाजातील अतिशय विक्षिप्त व विकृत घटणांचे आक्रंदण वृत्तपत्रातुन वाचायला मिळते. एकाकी रहाणे, अबोल रहाणे, व्यक्त न होणे ही फार घातक आणि गंभीर बाब आहे. असे वागणे विचित्र माणसिकतेला आमंत्रण देत असते.
आजची बरीच तरूण पिढी व म्हातारपण ह्या एकाकी पणाचा शिकार होतांना दिसताहेत. दोघांचेही कारणे भिन्न असुन अवस्था मात्र सारखीच आहे. तरूण वयात त्यांना येणार्या चांगल्या वाईट अनुभवाने त्यांच्या मनाची झालेली तगमग व घालमेल कुठेतरी व्यक्त व्हायला पाहिजे. परंतु ती होतांना दिसत नाही. त्याचे कारण की, त्यांना आपल्या जवळचा व समजुन घेणारा असा व्यक्ती 'आपला माणुस' सापडत नाही. तेंव्हा ते आपल्या माणसाची शोधाशोध करित असतात. पण तो मिळत नाही. अशा वेळी त्यांच्या मनातल्या भावनांचा उद्रेक होतो आणि त्याचे परावर्तन एका अविचारी आचरणात वा कृत्यात होण्याची दाट शक्यता असते. त्यातुन खुन, आत्महत्या, बलात्कार असे दुष्कृत्य घडुन येते. त्यामुळे ते समाजाला कुटुंबाला घातक ठरते किंबहुना त्या पिडीत तरुणाईचे अस्तीत्वच धोक्यात येते. पर्यायाने देशाची वैचारीक हानीही होते.
म्हातार्यांचं जगणं तर त्याही पेक्षा वेगळचं एकांगी होऊ लागलं आहे. सर्व काही असुन सुध्दा काहीही नसल्याचं उधार जगणं त्यांच्या नशीबी आलं आहे. कारण म्हातार्या आईबाबांना आश्रमात सोडणारे बरेच बहाद्दर तरूण आपल्या कृतघ्न वृत्तीचा परिचय देतांना दिसत आहे. वाढलेल्या वयाने खिळखिळ झालेल्या हाडांना व खंगलेल्या मनाला सांभाळणारा सक्षम हातांचा आणि संवेदनशील मनाचा आधार हवा असतो. पण जर का तोही मिळाला नाही. तर आप्तांच्या बैठकीत त्यांना निर्मणुष्य वाळवंट दिसू लागतो. आणि नको असलेलं एकाकी पण वाट्याला येतं.
परंतू मित्रहो, नेहमी एक सांगावसं वाटतं... हरेकाच्या जिवनात प्रत्येक वळणावर अशी सुख दुखाची आवर्तनं येत राहतील. तेंव्हा खचुन जायचं नसतं तर खंबीर पणे अशा परिस्थितीचा सामना करायचा असतो. जगण्याचा निर्धार उराशी बाळगुन नव्या सुर्याला डोळ्यात मळायचं असतं. आयुष्य हे जगण्यासाठी मिळालेलं आहे. ते असंच निरर्थक संपवुन टाकायचं नसतं. व्यक्त होण्यासाठी आपण आपल्या माणसाचा शोध घेत असतांना इतरांचे अस्तीत्व झिडकारत असतो. तेंव्हा आपल्या माणसाचा शोध तिथेच संपुन जातो. आणि आपण एकटे होत असतो. म्हणुन माणवाचं माणवाशी असलेलं नातं जाणुन घ्यायला हवं. त्याचं अस्तीत्व जाणायला हवं. एकदा तरी आपले पणाची हाक कुणाला मारायला हवी, दुसर्याच्या प्रेमाची वाट बघत रहाण्या पेक्षा स्वत:च प्रेमाचा अनंत झरा व्हायला हवा. असाच दृष्टीकोन सतत मनात बिंबवत आजुबाजुला बघाल तर पृथ्वी तलावरील सर्व माणवजात ही आपली माणसं वाटायला लागतील. मग एकट्यातही गर्दिचे आभास व्हायला लागतील. तेंव्हा मोकळे व्हा, व्यक्त व्हा. माध्यमं कुठलेही असु द्या परंतु मनमोकळे बोला. मनमोकळे जगा आणि जगवा. कारण एकाकीपण अधिक घातक आणि जीवघेणं असतं....!
शेवटी एकच..... आयुष्यात स्वतःला कधी 'उध्वस्थ' होऊ देवु नका कारण लोक ढासाळलेल्या घराच्या विटाही सोडत नाही. संकटावर असं तुटून पडायचं की, जिॆकलो तरी ईतिहास आणि हरलो तरी ईतिहासच घडला पाहिजे.
- किशोर तळोकार, यवतमाळ ९६७३०६०७६२
risingkt@gmail.com
नक्की पहा व ईतरांनाही
शेअर करा..._/!\_
एकाकीपण असतं अधिक घातक आणि जीवघेणं.!
ℓσиєℓiиєѕѕ is very destructive and detrimental..!
एकटे रहाणे, एकाकी वाटणे, कुणाशीही व्यक्त न होणे. असं जगणं अधिक घातक आणि जीवघेणं जगणं असतं. व्यक्त होण्यासाठी आपण आपल्या माणसाचा शोध घेत असतांना इतरांचे अस्तीत्व झिडकारत असतो. आणि आपण एकटे होत असतो. म्हणुन माणवाचं माणवाशी असलेलं नातं जाणुन घ्यायला हवं. त्याचं अस्तीत्व जाणायला हवं. एकदा तरी आपले पणाची हाक कुणाला मारायला हवी.... संपुर्ण लेख ऐकण्यासाठी क्लिक करा 👉
https://youtu.be/0eY6AHpRDLU

No comments:
Post a Comment