Thursday, 16 April 2015

छञपती शिवरायांना मानाचा मुजरा ।।

छञपती शिवरायांना मानाचा मुजरा ।।

....भल्या मोठ्या जल्लोषात दिमाखात आज महाराजांची जयंती साजरी होणार ! लक्ष युवक महाराजांचा फेसबुक पासुन तर व्हाट्सअप पर्यंत शुभेच्छांचे वर्षाव करणार.! खरचं आनंदाची व अभिमानाची बाब आहे. मराठी अस्मितेच्या सन्मानाची बाब आहे. पण मिञहो महारांजाना फक्तच डोक्यावर घेवून नाचू नका तर डोक्यात घाला..!! कारण महाराजांचे रूप हे आठवले तरी अभिमानाने छाती फुगते. नाव जरी काढले तरी अंगावर काटा उभा राहतो. त्यांचे आठवावे रूप आणि  आठवावा प्रताप ।।
      आज शिवाजी महाराज की जय, हा जयघोष सगळीकडे मानानं दुमदुमणार.!  पण उद्या माञ पुन्हा आपण त्याच रूपात वावरू तीच धावपळ तीच तळपळ. स्वार्थानं पांघरलेलं दुर गेलेलं माणूस पण..! अगदी अगदी किळसवाणं वाटावी अशी वागणुक. रोज आयाबहिणी्च्या इज्जतीशी खेळणारे काही नराधम. हे सगळं त्या महाराजांच्या राज्यात घडतांना पाहून शरम वाटते. माणवाच्या रूपात पशूपण जगणार्या हावर्या वृत्तीची खरच कीव वाटते. जाती भेदावर होणारी दंगले, धार्मिक विटंबणा. विचीञ आहे ! त्यातल्या त्यात शिवाजींना डोक्यावर घेवून नाचनाराच डोक्यात जातीभेदाचं खुळं घेवून सहज वावरतो आहे. महाराजांनी तर कधी जातीभेद पाळलाही नाही. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे असंख्य मावळे विविध जातीधर्मातील होते. सच्चे निष्टावाण सेवक- मिञ स्वराज्याच्या उभारणीला त्यांच्या सोबत होते हे उल्लेखनीय.! आजही आपण धर्माच्या नावाखाली जणावरांची कित्येक कत्तल होतांना पाहतो. अन् अंधश्रद्धा पाळतो. भले महाराजही धार्मिक होते पण कधीही अंधश्रद्धा पाळली नाही. धर्माच्या नावाखाली कुठलाही छळ कुणाचाही केला नाही. हे माहीत असले पाहीजे. आज शेतकर्यावरच उपासमारीची पाळी आली आहे. महाराज म्हणत होते "लाख मेले तरी चालतील पण पोशिंदा जगला पाहिजे..!" पण इथे राजकारणी सबसिडीच्या प्रलोभणावर शेतकर्‍यांचे शोषण करतो आहे. असो बरच काही माडावसं वाटते. पण आपल्याला हार मानून चालनार नाही. अशा बहाद्दरांना धडा आपण शिकवला पाहीजे. शिवाजींचे विचार मनामनात पोहचले पाहीजे. म्हणुन मिञहो पुन्हा आज शिवचरिञाचे पठण  व चिंतन करणे नित्तांत गरजेचे आहे. नाही तर मराठी व माणुसकी मातीत गेल्या शिवाय राहणार नाही..!!
 ।जय जिजाऊ । जय शिवराय ।।
ले- किशोर तळोकार 9673060762
(19 फेब्रु 2015)

No comments: