"तुझी याद...!"
त्या अशा सांज वेळी तुझी याद आली,
बेधुंद मनास तु स्वप्नात भेटाया आली।
तुझ्यात का गं हे मन असे गुंतले,
हरवून जगास तु मला शोधाया आली।
आवेश पावसाचा असा स्थिर झाला,
चिंब भिजून मला भास द्यावया आली।
नको राहू तु कधी दूर अशी माझ्या,
स्वप्नात विरहाची भयानक रात आली।
आकांत तुला भेटण्याचा करता पहाटे,
कोवळी पहाट तुझा पता घेऊन आली।
फुलली कळी गुलाबी हलकेच ह्रद्यातून,
जरा लाजलो मी जशी समोर तु आली।
नजर माझी आता करते उगाच बहाणे,
हातात हात तुझा द्याया चांदणेही आली।
निखळ साथ तुला मी देईल आजन्म,
तुझी सुखाची खान, तारे घेऊन आली।
-- किशोर तळोकार
9673060762
त्या अशा सांज वेळी तुझी याद आली,
बेधुंद मनास तु स्वप्नात भेटाया आली।
तुझ्यात का गं हे मन असे गुंतले,
हरवून जगास तु मला शोधाया आली।
आवेश पावसाचा असा स्थिर झाला,
चिंब भिजून मला भास द्यावया आली।
नको राहू तु कधी दूर अशी माझ्या,
स्वप्नात विरहाची भयानक रात आली।
आकांत तुला भेटण्याचा करता पहाटे,
कोवळी पहाट तुझा पता घेऊन आली।
फुलली कळी गुलाबी हलकेच ह्रद्यातून,
जरा लाजलो मी जशी समोर तु आली।
नजर माझी आता करते उगाच बहाणे,
हातात हात तुझा द्याया चांदणेही आली।
निखळ साथ तुला मी देईल आजन्म,
तुझी सुखाची खान, तारे घेऊन आली।
-- किशोर तळोकार
9673060762

No comments:
Post a Comment