Wednesday, 8 April 2015

माह्यी खिल्लारी

'माह्यी खिल्लारी'

माह्यी खिल्लारी ही जोडी,
सार्‍या रानाची तिले गोडी ।

पांदणीत रुणझुण तिची,
जणु शिवार गुणगुण करी ।

जोर पायी हिरणी वाणी,
ती चाले सरसर रानीवनी ।

होता डौल तिचा रूबाबी,
अवघं रान सलाम ठोकी ।

मी राबलो घेऊन शिदोरी,
ती झिजली उपाशी पोटी ।

- किशोर  तळोकार
9673060762

No comments: