Friday, 17 April 2015

बघा पटतेय का.....!


बघा पटतेय का.....!

थोडा विचार करा......🙇
   
      आजकाल प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार दुर दुर पर्यंत अगदी तळगळात पोहचला आहे. आता तो कमी होईल अशी सुतराम शक्यताही वर्तवणे शक्य नाही. असेच रोज अनुभव आलेत की, मन अगदी सुन्न होतं. कुणाला समजावावं कुणाशी ह्यावर चर्चा करावी काहीच सुचत नाही. त्या लोकांची ही नेहमीची वागणुक पाहीली की, त्यांची खुप किव येते त्यांच्या माणसिकतेवर हसायलाही येतं.. वाटतं ह्यांना कुठली भाषा समजेल.....???????

🙇🙇🙇🙇🙇🙇🙇

..माझ्याकडे काय आहे ह्या पेक्षा
माझ्याकडे काय नाही ह्याचाच
आपण जास्त विचार करतो.
मग निव्वळ संचय करण्याच्या नादी
लागून भाव भावनेचा विसर पडतो.
माणूसपण जपण्याचं सोडून फक्त
लोभच मनाची जागा व्यापतो.

तेंव्हा अती लोभापाई आपण कुणाचं
तरी शोषणच करत असतो..!

- किशोर  तळोकार 9673060762

No comments: