Monday, 20 April 2015

माणुसकी

गावात माणुसकीचा भाव पाहिला मी,
शहरात ईमानाचा अभाव पाहिला मी ।

शिकुन खुप आता काय शिकलो मी,
शिक्षित माणसाचा तणाव पाहिला मी ।

वाचुन ग्रंथ मिळवले ज्ञान कितीतरी,
ज्ञानीच माणसाचा दृष्टडाव पाहिला मी ।

पैशावर गर्व केले प्रतिष्ठेसाठी सर्व केले,
नात्यांचा भरबाजारी लिलाव पाहिला मी ।

रोज पुजा पाठ;  लाख देव पुजीतो ईथे,
पुजारीच करतांना दुजाभाव पाहिला मी ।

- किशोर तळोकार
9673060762

No comments: