Monday, 20 July 2015

प्रित न्यारी...!

प्रित न्यारी....!!!

ह्या एकांत क्षणी,
फक्त तुच तु मनी !
अबोल दु नयनांनी,
केली बात दिवानी !!

त्या काळोख राञी,
हा आसमंत सुगंधी !
बेधुंदीत ते मनही,
गंधीत झाले तनही !!

ती राञ वेड्यांची,
गहरी बात दोघांची !
मंद प्रकाश चंदेरी,
संग मनाचा स्वप्नेरी !!

गर्द काळी सावली,
चमके नभी चांदणी !
तूटतो तारा अंगणी,
देतो अतुट शाश्वती !!

अबोल प्रित न्यारी,
खरी सुखाची शिदोरी !
ती अव्यक्त भावनाही,
अखेर त्याची कहाणी !!

©किशोर तळोकार
दि.20/07/15
7.00pm

No comments: