कधी कधी ऊन्हं असं सावली सारखं का भासते,
कधी कधी सावली अशी ऊन्हां सारखी का सलते ॥
पाहिजे ते मिळत नाही,
कळते पण वळत नाही,
रोज रोजची कामे सारखी,
केली किती तरी सरत नाही,
कधी कधी मन असे कावरे बावरे का होते,
कधी कधी काहीतरी हरवल्या सारखे का होते ॥
वाट पहावी तरी कुणाची,
जिव्हाळा आता उरला नाही,
पहुडले तरी झोप नाही,
स्वप्नात आता रस नाही,
कधी कधी खुप वाटते चिंब भिजून खुप नाचावे,
कधी कधी खुप वाटते लहानपण पुन्हा जगावे ॥
आता कुठे तसा पाऊस नाही,
बेधुंद नाचाया मुक्तांगण नाही,
होतो म्हटलं एकदा बाळ तरी,
ते लहाणपण परत येत नाही,
कधी कधी ऊन्हं असं सावली सारखं का भासते,
कधी कधी सावली अशी ऊन्हां सारखी का सलते ॥
-किशोर तळोकार
दि.21/07/15
वेळ -सायं 7.00
कधी कधी सावली अशी ऊन्हां सारखी का सलते ॥
पाहिजे ते मिळत नाही,
कळते पण वळत नाही,
रोज रोजची कामे सारखी,
केली किती तरी सरत नाही,
कधी कधी मन असे कावरे बावरे का होते,
कधी कधी काहीतरी हरवल्या सारखे का होते ॥
वाट पहावी तरी कुणाची,
जिव्हाळा आता उरला नाही,
पहुडले तरी झोप नाही,
स्वप्नात आता रस नाही,
कधी कधी खुप वाटते चिंब भिजून खुप नाचावे,
कधी कधी खुप वाटते लहानपण पुन्हा जगावे ॥
आता कुठे तसा पाऊस नाही,
बेधुंद नाचाया मुक्तांगण नाही,
होतो म्हटलं एकदा बाळ तरी,
ते लहाणपण परत येत नाही,
कधी कधी ऊन्हं असं सावली सारखं का भासते,
कधी कधी सावली अशी ऊन्हां सारखी का सलते ॥
-किशोर तळोकार
दि.21/07/15
वेळ -सायं 7.00

No comments:
Post a Comment