Friday, 4 September 2015

शिक्षकदिनी थोडी हितगूज

नमस्कार,
     मी किशोर तळोकार..!
आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. व आज दिनी ज्या ज्या शिक्षकमिञांचा गौरव होते आहे त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन..!💐🌷
   आज शिक्षकदिना निमित्य आपल्याशी हितगुज करावेसे वाटत आहे......
      आपल्याला शिकवणारे शिक्षक हे खरचं आजही जेंव्हा आठवतात तेंव्हा आणखी उत्साह वाढतो.! त्यांच्या मुळे आपण घडलो. आणि आता तीच जबाबदारी आपल्यावर आली आहे " तेंव्हा जे जे आपणासी ठावे ते ते चिमुकल्यांना द्यावे शहाणे करून सोडावे सकळजण...!"
आपणाला हा वसाच अंगिकारायचा आहे. त्याकरिता कुठलाही सत्कार नको चिमूकल्यांतुन एक समजपुर्ण माणुस घडावा एवढीच आर्त हाक अाहे.!
       आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने शैक्षणिक उपक्रमशील तळमळीच्या शिक्षकांचा गुणगौरव केल्या जातो त्यांचा मानसन्मान केल्या जातो. अशा ह्या दिवशी सर्वजण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतात. पण आज समाजात शिक्षकांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन जरा नकारात्मक होतांना दिसतो आहे. तर कुठे खुप जास्त सकारात्मकही आहे हे पण नाकारता येणार नाही. परंतु लोकांमध्ये अशी सकारात्मकता येण्यासाठी आपल्याला समाजाप्रती व आपल्या व्यवसायाप्रती एक स्वच्छ भाव असणे आवश्यकच आहे. आपल्या विद्यार्थ्यांप्रती मनस्वी कामकरण्याची तयारी असेल तर जगातला कुठलाही व्यक्ती आपल्या कामावर अंकुश उगारु शकणार नाही.
     आज विद्यार्थ्यासाठी तनमन अर्पण करणारे, व्यवसायाला सेवा समजणारेही शिक्षकमिञ आहेत व ह्या पेशाला फक्त व्यवसाय म्हणुन बघणारे सुध्दा मिञ आहेत. पण ह्यात फरक काय की, जो सेवा समजतो तो समाधानी व सर्व परिस्थितीचा स्विकार करणारा असतो. उलटपक्षी जो ह्याला व्यवसाय समजतो तेंव्हा तो कधीही समाधानी राहुच शकणार नाही कारण शैक्षणिक क्षेञात अनेक आव्हाने आहेत ते पेलण्याची क्षमता ही तळमळीने काम करणार्‍यांमध्येच येऊ शकते. समाजाचा दृष्टीकोन बदलावयाचा असेल तर आपले मनस्वी योगदान द्यावेच लागणार त्याशिवाय सामाजिक दृष्टीकोन आपल्याप्रती सकारात्मक होणार नाही. (डिझिटायझेशन) यांञिक प्रलोभन हे शेवटी क्षणिकच आहे. ह्यावर विचार करायला हवा. शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया ही इंटरअॅक्टीव बोर्डवर होणार नाही हेही तितकेच खरे. विद्यार्थ्यातुन एक  समजपुर्वक माणुस व सुविद्य सक्षम युवक जो पर्यंत घडणार नाही तो पर्यंत शिक्षणाचे फलनिष्पत्ती यथार्थ झाली असे म्हणता येणार नाही.
      आज तंञस्नेही शिक्षकांनी आपल्यातील असणार्या क्षमतेला सिध्द केले आहे. त्यावेळी शासन प्रशासनाला माझी एवढीच नम्र विनंती आहे की, आमच्या मध्ये बदल घडवण्याची ताकद आहे. फक्त आंम्हाला संधी हवी वातावरण हवी. आम्हीही परिस्थीती निर्माण करु शकतो. हा विश्वास मनात आहे. आणि हा विश्वास मनामध्ये अविरत तेवत ठेवणार आहे. आणि आजन्म आता आपल्यातील शिक्षक आपल्याला जिवंत ठेवायचा आहे.
      तेंव्हा पुनश्च शिक्षक दिनाच्या माझ्या सर्व ज्येष्ठ/सोबती/मिञ/बंधु/बघिणी शिक्षकांनाना खुप खुप शुभेच्छा..! 💐🎉

✒किशोर तळोकार
     9673060762
      (सहा.शिक्षक)

💐🌿🌷🍂🌹🌿🌻🍂🌺

No comments: