Wednesday, 23 September 2015

मी शोधण्या इमान
बाहेर अता निघालो ।
कळले मज चुकीचा
घेत पता निघालो ॥

येथे किती बेधुंद
आलोय जगण्यास मी ।
खिळली बंधने ठायी
परी अता निघालो ॥

देवळात देव शोधला
गवसला नाही ।
पदस्पर्श करण्या
आईचे अता निघालो ॥

ऐकतो फुके आश्वासन
नेत्यांची रोजच ।
गैर बाजारी मत
विकून अता निघालो ॥

पुन्हा भांडून भावनांशी
केला कल्लोळ मी ।
जरा हसलो अन्
आवेश असा गिळालो ॥

©किशोर तळोकार
    9673060762
Dated-23/09/15

No comments: