एक सत्य....मला उमगलेलं..!!
एक सत्य मला उमजलेलं
अनेक सोबती भेटतात,
मिञ होऊन या वाटेवर।
काही देती निखळ साथ,
काही सोडती अर्ध्यावर॥
कधी कुणाची साथ अशी,
चालती फक्त दोन पाऊले।
आयुष्यभराची पक्के सोबती,
असा विश्वास देती पाऊले॥
तर कुणाला वाटे हेवा,
आपल्याच भव्य यशाचा।
खोचून काटे वाटेत ठेवी,
करी अडसर मार्गाचा॥
मला उमगले एक सत्य,
ऐकू यावी अंतर्मनाची साद।
कोण परके कोण आपले,
सहज कळून येईल वाद॥
©किशोर तळोकार (दि.२९/०९/१५)
🍃🌿🍂🍃🌿🍂🍃🌿🍂
No comments:
Post a Comment