....सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण आपल्या आखलेल्या विश्वात गुंतलेला असतो. आणि खोट्या फुशारक्या मारून वेळ मारत जगत असतो. त्याच अनुभवातली सहज सुचलेली ही "खोटी फुशारकी" एक रचना. सादर करतोय आवडल्यास नक्की शेअर करा- किशोर तळोकार (9673060762)
खोटी फुशारकी
आज का कुणी कुणाला,
जराही पुसत नाही ।
ओल्या उघड्या जखमांवर
थोडी फुंकर मारत नाही ।।
तुझं तुझं माझं माझं,
जगणं का सोडत नाही ।
गर्दी मधल्या एकटेपणाला,
सोबती का मिळत नाही ।।
मला काय घेणं देणं,
कुणाची मला गरज नाही ।
पृथ्वीवरचा हा मानवी जीव,
ही खोटी समज का सोडत नाही ।।
मी मोठा माझंच खरं,
ह्याला स्वाभिमान म्हणत नाही ।
अरे मानवा तुझ्यातून ह्या,
दाणवाला का काढत नाही ।।
©किशोर तळोकार
दि. ७!१०!१५
खोटी फुशारकी
आज का कुणी कुणाला,
जराही पुसत नाही ।
ओल्या उघड्या जखमांवर
थोडी फुंकर मारत नाही ।।
तुझं तुझं माझं माझं,
जगणं का सोडत नाही ।
गर्दी मधल्या एकटेपणाला,
सोबती का मिळत नाही ।।
मला काय घेणं देणं,
कुणाची मला गरज नाही ।
पृथ्वीवरचा हा मानवी जीव,
ही खोटी समज का सोडत नाही ।।
मी मोठा माझंच खरं,
ह्याला स्वाभिमान म्हणत नाही ।
अरे मानवा तुझ्यातून ह्या,
दाणवाला का काढत नाही ।।
©किशोर तळोकार
दि. ७!१०!१५
9673060762
No comments:
Post a Comment