"येथे खेळ निर्मिकाचा"
✒किशोर तळोकार©
9673060762
येथे खेळ निर्मिकाचा,
आम्ही ईथले खेळाडू !
मानवी जन्म आमुचा
नको जातीचा तराजू !
कर्मात सामर्थ्य आहे,
ना दोष प्रारब्दा देऊ !
भविष्याची चिंता नाही
वर्तमान जागे ठेवू !
शब्द कुणाचा पाळावा,
आमचं आम्ही ठरवू !
स्वातंञ्य अस्तीत्व आहे,
फक्त न्यायच स्वीकारू !
करू पुरुषार्थ सिध्द,
मानवियता जगवू !
दि. १२-१०-१५

No comments:
Post a Comment