Friday, 16 October 2015

एक गोड अनुभव..!

🍂एक गोड अनुभव..!😘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
.....ती रोज नियमितपणे आपल्या गणवेशात छान तयारी करून येते.. न बोलता फक्त मुक्याने परीपाठातील सर्व हालचाली नेटकी करते. सर्व वर्गात आले की, सगळ्यांसोबत येऊन बसते..... कुणाशी एक अक्षरही बोलत नाही.. पण गोड लाजरं हास्य हळुच तिच्या चेहर्‍यावर येतं.  जे काही वर्गात सुरु असतं त्याकडे तिचं चौफेर लक्ष असतं.... जे सांगितलं तसं तंतोतंत पाटीवर गिरवते... खाली मान... नजर अधुनमधुन माझ्याकडे करत... लाजत बुजत... हळूच आपल्या कोवळ्या हाताने गिरवलेली पाटी घेवुन मला दाखवते.... तिला शाब्बास..! व्हेरी गुड गर्ल..! म्हटलं की, पुन्हा ते लाजरं हसु ईवल्या ओठावर आणुन आपल्या जागी जाऊन बसते..... अगदी निरागस तिचं असं वागणं तिच्यातल्या खर्‍याखुर्‍या व्यक्तिरेखेला नेहमी खुलवत असतं.. ओळखीच्या मैञिणी सोबत सहजता अन् अनोळखीची सहज स्विकार करणारी.... आपल्या तक्रारी सार्या अडचणी फक्त तिच्या आवडत्या दुसरीतल्या साक्षीताई सोबत व्यक्त करणारी.... माझ्या ईयत्ता १ लीच्या वर्गातील ही चिमुकली...जिचं नाव "रुपाली".....!
.......शाळा करून घरी आलो अन् थोडा निवांत घेतला. तिचा निरागस चिमुकला चेहरा डोळ्यापुढे आला.... लागलीच लेखनी घेवुन मन तिचं व्यक्तिचिञ रेखाटु लागलं....! ....तिच्या अबोल संवादासाठी सुचलेल्या काही ओळी आपणापुढे सादर करतो...!!!!

-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

अगं रुपाली .....!!

तु छकूली ,
की अबोली २
अगं रुपाली
तु का बोलत नाही ।।

रोज शाळेत येते,
तु अभ्यास करते,
कुणाशी गं मैञी,
तु करत नाही ।
   अगं रुपाली
   तु का बोलत नाही ।।

रोज छान सजते,
किती गोड हसते,
बघता तुला,
तु लाजली ।
    अगं रुपाली
    तु का बोलत नाही ।।

तुझ्या केसात फुल,
तुझ्या कानात डूल,
ओठांची कळी,
का खुलत नाही ।
    अगं रुपाली
    तु का बोलत नाही ।।

-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

.....ह्या ईवल्याश्या छोट्या मुलांचं आयुष्य किती खरं  असतं.... त्यांचं जग किती बोलकं अन् निरागस असतं. तिथे कुठल्याही निरर्थक आचार विचाराला आणि भेदभावाच्या खुळचट माणसिकतेचा स्पर्श नसतो... खरचं असचं काहीसं आपलंही जिवन असतं तर.... असा मनातल्या कप्प्यातला एक आवाज नेहमी कुरकुरत असतो...!
 ©किशोर तळोकार
     9673060762
दि.१४!१०!१५
🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
www.kishortalokar.blogspot.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments: