तो_नसावा मी..
ह्या स्वच्छंद निळ्या आकाशी असाच बेधुंद मनाचा मी,
कधी न केला निरर्थक कांगावा नश्वर तनाचा मी।
उराच्या खोल जपले धगधगते दुःख कितीतरी,
कधी न स्विकारला वासन्न आधार स्वार्थी जगाचा मी।
निसर्ग खेळत असतो विध्वंसी डाव त्याचा नेहमी,
हा डाव उधळीत दिला हिशेब त्याच्याच कराचा मी।
त्या लाकडावर जळण्याची भिती कशाला मरनांती,
राख झाल्यावरही दिवा होऊन जळेल घराचा मी।
मानापमानाचा शंख खुप करतो हरेक नेहमी,
थोर किती झाले; तरी मानतो महान स्वतःला मी।
ह्या अशा नाटकी जगात जन्मलो मी दिवाना अडाणी,
शोधलो स्वतःत स्वतःला; तेंव्हा कळले तो नसावा मी।
दि.२८.१०.१५
-किशोर तळोकार
9673060762

No comments:
Post a Comment