Thursday, 29 October 2015

नवा दिवस यावा

🌅 नवा दिवस यावा 🌅

कधी बेधुंदीत वाहतो वारा,
कधी अंगणी प्राजक्तांचा सडा ।

कोवळे किरण काढतो नक्षी,
रवि ते पाहून मनी हसला।

फुले सुगंधीत करी मातीला
जणु अत्तरी पाऊस पडला ।

दवबिंदूत चिंब न्हाली सृष्टी,
सत्य दृष्टी निसर्गा दे मानवा ।

कौतुक करी नव बहराचे,
हत्या भ्रूणाची नकोत व्हायला ।

कधी असा नवा दिवस यावा,
तो अज्ञानी काळोख दुर व्हावा ।
-किशोर तळोकार© 9673060762
दि.१६/१०/१५

No comments: