॥दिपावली॥
----------------------------------
✨ 🇰 🇹 🇦 🇱 🇴 🇰 🇦 🇷 ✨
9 6 7 3 0 6 0 7 6 2
किती आनंद झाला हो अंगणी,
पाना फुलांनी सजली धरती॥
फुले झेंडूची पिवळी,
पाने आंब्याची हिरवी,
हार तोरणाने छान,
खिडकी दारं सजली।
वसुंधरा सुवासिक हो झाली,
जणु सुगंधी अभ्यंग न्हाहली॥
विणाची तार छेडली,
गोड धुन कानी आली,
आसमंत हा विभोर,
पहाट सुरेल झाली।
चिवडा, चकली, गोड करंजी,
पाळे, लाडू, बर्फी छान जमली॥
चवदार मेजवाणी,
रंगात रंग रंगली,
नाते गोते आले सारे,
प्रेमात बहार आली।
किती आनंद झाला हो अंगणी,
सिरीज दिव्याने सजल्या भिंती॥
आली आली हो दिवाळी,
विसरा आतीषबाजी,
जुळवा हो गाठ भेटी,
नाते जपो दिपावली।
किती आनंद झाला हो अंगणी,
सुख घेवुन आली दिपावली॥
-किशोर तळोकार
दि.३.११.१५
✨ 🇰 🇹 🇦 🇱 🇴 🇰 🇦 🇷 ✨
**********************************
www.kishortalokar.blogspot.in
----------------------------------
✨ 🇰 🇹 🇦 🇱 🇴 🇰 🇦 🇷 ✨
9 6 7 3 0 6 0 7 6 2
किती आनंद झाला हो अंगणी,
पाना फुलांनी सजली धरती॥
फुले झेंडूची पिवळी,
पाने आंब्याची हिरवी,
हार तोरणाने छान,
खिडकी दारं सजली।
वसुंधरा सुवासिक हो झाली,
जणु सुगंधी अभ्यंग न्हाहली॥
विणाची तार छेडली,
गोड धुन कानी आली,
आसमंत हा विभोर,
पहाट सुरेल झाली।
चिवडा, चकली, गोड करंजी,
पाळे, लाडू, बर्फी छान जमली॥
चवदार मेजवाणी,
रंगात रंग रंगली,
नाते गोते आले सारे,
प्रेमात बहार आली।
किती आनंद झाला हो अंगणी,
सिरीज दिव्याने सजल्या भिंती॥
आली आली हो दिवाळी,
विसरा आतीषबाजी,
जुळवा हो गाठ भेटी,
नाते जपो दिपावली।
किती आनंद झाला हो अंगणी,
सुख घेवुन आली दिपावली॥
-किशोर तळोकार
दि.३.११.१५
✨ 🇰 🇹 🇦 🇱 🇴 🇰 🇦 🇷 ✨
**********************************
www.kishortalokar.blogspot.in
No comments:
Post a Comment