Wednesday, 4 November 2015

फक्त स्वप्नच राहिल "गुणवत्ता"

फक्त स्वप्नच राहिल "गुणवत्ता"
----------------------------------
 🇰  🇹 🇦 🇱 🇴 🇰 🇦 🇷
  9  6  7  3  0  6  0  7  6  2


कुणीही यावे टिळा लावुन जावे,
ईशार्‍यावर नाचे गुर्जी बिचारा ।
शिक्षणाचं काही खरं नाही आता ,
फक्त स्वप्नच राहिल "गुणवत्ता" ।।

शिक्षण असतो खेळ हा मनाचा,
विद्यार्थी गुरूची आंतर क्रियेचा ।
समतोल ढळला जर दोघांचा,
करू नये अपेक्षा गुणांची अाता ।।
फक्त स्वप्नच.....

सरलने सारे पिंजून टाकले,
शालार्थ साठीही गुर्जीच डांबले ।
अशैक्षणिक काम नशीबी आले,
थांबला नाही जर हा खेळ आता ।।
फक्त स्वप्नच.....

गुर्जीही असे सदस्य कुटुंबाचा,
भार असतो त्याच्या वर सर्वांचा ।
अड्याल पड्याल नोकरी करतो,
कशी असेल माणसिकता सांगा ।।
फक्त स्वप्नच.....

-किशोर तळोकार
       दि.४.११.१५

No comments: