Friday, 8 January 2016

एक नवस....!

एक नवस....!

(एक मोलमजूरी करणारी बाई रोज आपल्या छोट्या मुलीला तिची ईच्छा नसतांना सोबत घेवुन जाते. परंतू परीस्थिती पुढे त्यांचा नाईलाज असतो,
अशा वेळी ती मुलगी आपल्या आईला एक विनवणी करते...)

मा तु देवाला एक नवस कर गं,
शिकाचय मला त्या सांगुन ठेव गं।

तुही पोर हाय गुणी विश्वास दे गं,
माह्यावर एक उपकार कर गं।

पैशासाठी वेळ वाया नको घालु गं,
भुकीसाठी माह्य सपन ना मोडू गं।

मजुरीनं कुठं भुक ही भागेल गं,
शिकुन मोठी साहेबीन होईन गं,

चार चाकी गाडीत तुले बी नेईन गं,
जवा मले सारे साक्षर म्हणेल गं,

साक्षर होऊन सुख सारं ईल गं,
अंधाराचा आता प्रकाश होईल गं,

मा तु देवाला एक नवस कर गं,
मांग वरदान शाळा मी शिकेन गं।

-किशोर तळोकार

No comments: