Friday, 8 January 2016

प्रित तुझी.....

प्रित तुझी.....

जेव्हा तुझे नी माझे क्षण आठवत होतो,
हवेतील गारवा हलकाच छेडून जातो ।

अंगावर तुझ्या प्रितीचा तरंग उमटतो,
त्याच्या वलयातुन तुझा स्पर्श जाणवतो।

भुंगा जेंव्हा फुलातील रस शोषित होता,
तुझे बोलने हसने रुसने जणु तो ऐकत होता।

आसमंत जेंव्हा निद्रा आस्वादित होता,
मन माझे तुझ्या भेटीचे  रंग चढवत होता।

सखे तुझे मुखकमल असे जादूगार होते,
तुझ्या अदांनी सारं काही विस्मरण होते।

सखे तुझ्याविणा गं अपुर्ण मी होतो,
तुझ्या चीर संगतीने मी पुर्णत्वास येतो।

अखंड तुझा श्वास राही अखंड साथ माझी,
आहे असा विश्वास जगण्यात मारू बाजी।

-किशोर तळोकार

No comments: