माझ्या अश्रुचे मलाच ओझे....
आता कुठे अनुभवाचा सांकव मी पाहिला आहे,
येथे येतांनाचा खडतर प्रवास मी पाहिला आहे।
जीवनाच्या वाटेवर तप्त झोंबणारा वारा पाहिला आहे,
सावलीचा आधार शोधन्या काटाही पायात टोचला आहे।
आता चाहुल आहे शांततेची ज्यात उद्याची मोक्ष निरवता शोधली आहे,
प्रहरातील धुक्यांच्या दवालाही माझ्या नसन्याचा होणारा भास मी पाहिला आहे।
अवकाशातील माझ्या अस्तीत्वाचे थेंब चहुबाजुंनी विखुरतांना मी पाहीले आहे,
सरतांनाचा असा प्रवास पाहुन माझ्या अश्रुचे मलाच ओझे झाले आहे।
- किशोर तळोकार

No comments:
Post a Comment