Friday, 8 January 2016

हिरवं सपन..!

हिरवं सपन..!

अरे भाऊ राजा आता काय सांगु तुले,
शेतात राबू राबू केसं माह्ये पिकले,

शेतामध्ये राजा नवनवे पिक घेत गेलो,
बाजारातले भाव पाहुन कुढु कुढु मेलो,

मले बी वाटे राजा नंबर माह्या बी येईल,
बायको लेकराईले सुखाच्या दारात नेईल,

शेवटी हातात माह्या मोडकं आलं तिफण,
दया कर भगवंता दाखव आशेचा किरण,

असा काही दाखव चमत्कार आता,
घाल जन्माला कुणी एक महात्मा,

धरणीच्या उदरातुन काढेल तो सोनं,
बळीराजाला देईन आत्मविश्वासाचं दान।

आत्महत्या नको करू समजुन घे जरा,
तु बी आसं "हिरवं सपन" पाहून घे जरा ।

-किशोर  तळोकार 

No comments: