दोस्ता.....!
उजाळलेल्या नव्या प्रवासाचा नवा आस्वाद,
आता तुझ्या पुढ्यात असतांना खुप छान वाटते।
सुखाच्या नव्या दिशा नवे आयुष्य नव्या वाटा,
आता तुझ्या जीवनात असतांना खुप बरे वाटते।
नकळत झालेली ही आपली भेठ गाठ,
मैञीच्या रुपात नव्या नात्याची सुरुवात वाटते।
साधा सरळ शांत पण खुप मोठ्या मनाचा तु,
आयुष्य जगत माझा अनुभवप्रवासी होतांना छान वाटते।
नात्याच्या पलीकडे असलेली तुझी साथ,
मला नेहमी जाणवनारी सख्या भावाची हाक वाटते।
तुझ्या माझ्या मैञीचा प्रवास अखंड असतांना,
गतकाळातील क्षणाची आठवत येताच उंच उडावेसे वाटते।
असंख्य सुखाचे क्षण तुझ्या आयुष्यात येवोत,
अशी शुभकामना तुला नेहमीच देत रहावेसे वाटते।
--किशोर तळोकार

No comments:
Post a Comment