ती कोण...?.
पहाटेच्या गार वार्याने अलगद एक कुजबुज केली,
ती कोण आहे..?
खेळणार्या मंद झुळूकाने गालावर एक टिचकी मारावी,
ती कोण आहे..?
सुमधुर पक्षांच्या किलबिलाने मनाच्या तरंगाला साद दिली,
ती कोण आहे..?
झरझरणार्या त्या पाण्याच्या आवाजाने ह्रदयाची हुरहुर वाढली,
ती कोण आहे..?
मनाच्या बेधुंद हरबळीने माझी उत्सुकता वाढली,
ती कोण आहे..?
आयुष्याच्या वाटेवर सुख दुख टिपणारी माझी सखी,
फक्त तू आहेस...
फक्त तूच आहेस...!
- किशोर तळोकार

No comments:
Post a Comment