Tuesday, 15 March 2016

अच्छे दिन आले वं माय..!

अच्छे दिन आले वं माय,
रडू नको आता खुस राय ॥

शेतात पिकवाले दाणा नाय,
अन्नाले झुरती पोरंबाय,
कर्जाचं डोंगर वाढत हाय,
उरला कोणता पर्याय नाय ।
अच्छे दिन आले वं माय,
रडू नको आता खुस राय ॥

सरकारले काय मांगतं आता,
ते म्हणे आम्ही कंगाल हाय,
कुणालाबी कर्ज माफी नाय,
बिजनेस वालैले सुट हाय ।
अच्छे दिन आले वं माय,
रडू नको आता खुस राय ॥

रेल्वेच्या चारशे स्टेशनवर,
लावले आता वायफाय,
शेतकर्या पेक्षा बी आता,
तंञज्ञान महत्वाचं हाय ।
अच्छे दिन आले वं माय,
रडू नको आता खुस राय ॥

जळुन मेली धरणीमाय,
कोणाला ती फिकीर नाय,
पोटापाण्याचे प्रश्न सोडून,
डिझिटल बकबक सुरू हाय ।
अच्छे दिन आले वं माय,
रडू नको आता खुस राय ॥

शिक्षणाचा खेळ खंडोबा,
शेतीवाडीचा झाला म्हसोबा,
वाढले राजकारणाचे पेव,
देश प्रगती करत हाय ।
अच्छे दिन आले वं माय,
रडू नको आता खुस राय ॥
~किशोर तळोकार 
दि. १५॥०३॥१६

No comments: