Wednesday, 23 March 2016

थोडे परखड पण...नम्र आवाहन..!

थोडे परखड पण...नम्र आवाहन..!
                 ~किशोर तळोकार 9673060762
                            दि.२४ मार्च २०१६

"पाण्याचा हाहाकार सगळीकडे...! कोण जबाबदार.....???"
        रिकाम्या कळश्या कमरेवर घेवुन चातकासारखी पाण्याच्या थेंबाची आस धरत कित्येक आज धडपडत आहे.. ह्याला कोण जबाबदार..? सदा हिरवळीच्या प्रदेशाला कोण अवकळा आली अन् ओसाड उजाड धरणी झाली.... ह्याला कोण जबाबदार..? नितीमत्तेच्या फक्त पोकळ गप्पा बाकी कृती शुन्य असलेली खोटी जमात आहे नं वर्तमानात.... हीच हीच.. आहे जबाबदार सार्या दुष्काळाला... होय आम्हीच ती खोटी मुखवटे घेवुन समाजकारणाचा आव आणत निसर्गाची लख्तरे वेशीवर टांगून सुखाचे उसासे घेत आहोत...! लज्जेचे दागिणे केंव्हाच गहाण ठेवुन आलोय दलालांच्या बाजारात.. मग ही थेरडी दृष्टी काय बघणार हा कुरूप देखावा... आणि आज मोठ्या कणीभरच्या ईभ्रतीचा आव आणत आम्ही जपतोय निसर्ग म्हणुन केवळ फु्क्कट आवाहन....!!!! नको... नको... हे खोटी शपथ..! कृती सत्यात उतरल्यासच सलाम ठोकू..__/!\__ #किशोर प्रण करतो आहे की, नाही खेळणार अमृतासम पाण्याशी होळी आजपासुन .....!!!! आणि तुम्ही..????
=¤~=¤~=¤~=¤~=¤~=¤~=¤~=¤~=¤~=¤~=¤~=

No comments: