आयुष्यातले अनेक कठीण पडाव पार केले,
संघर्षाला मात देणारे हरेक डाव पार केले।
उरात ठणकनार्या जखमाही
लिलया पोसल्या,
सशस्ञ त्या संकटाने असह्य
बेभाव वार केले।
अशाच वेळी ते सगेसोयरे
नातेही समजले,
अविश्वासाच्या फसव्या
कट्यारीने घाव चार केले।
मानले स्वतःला कर्मवीर मी;
माञ एक उणीव,
त्या काळसुचक कावळ्याने
कावकाव फार केले।
जन्माचा प्रवास अखेरचा
सरनावर संपला,
स्वार्थी जन्माने मला अता
सुखाचा सावकार केले।
~ किशोर तळोकार
9673060762
दि. ५.४.१६

No comments:
Post a Comment