पैसा..
जवा पैसा होते थोर,
तवा लागी जीवा घोर।
कागदाचा तुकडा हा,
करी माणसाले चोर॥
किती धाव पोटासाठी,
किती हाव सुखासाठी।
दोन पैशे खिशा मंधी,
कसं येते बघ जोर॥
दान फक्त देवळात,
लाथ मिळे भुकेल्यास।
पैशा पुढे मत खुजे,
नेता होते शिरजोर॥
माय झुरे पोरैसाठी,
बाप राबे पोटासाठी।
ताटातुट हिश्यासाठी,
केला पैशानं हा घोर॥
-किशोर तळोकार
५ मे १६

No comments:
Post a Comment