टिकीट टिकीट......
(एक कर्तव्यदक्ष वाहकाची सत्यकथा)
- किशोर तळोकार ९६७३०६०७६२
डायरेक्ट गाडी नसल्याने पहिल्याच स्टाॅप च्या बसमध्ये चढलो. घरी लवकर जायचं होतं.....माझ्या चिमुकल्याला वेळ देता येईल म्हणुन हा खटाटोप..! नेहमी सारखी तुडूंब पण माझ्यासाठी सर्व सामान्य गर्दी..! उभं राहायला जागा मिळाली एवढं पुरेसं होतं... एक आजोबा माझ्या आजूबाजूला येरझारा घालत कुरकुरत होते. जागा नाही म्हणुन..! मनात विचार आला कुणाला म्हणावं भाऊ सरका थोडे, बसु द्या आजोबाला.. पण त्याच्या चेहर्यावरचे भाव बघुन म्हटलं राहू उगाचच चिडायचा हा आणि आपण आपला चांगला मुड घालवुन बसू... तेवढ्यात कंडेक्टर जवळच्या व्यक्तीला त्या आजोबाची दया आली अन् त्यांना बसवुन घेतलं... बरं वाटलं.. माणसात राहतो आपण ह्याचं समाधान वाटलं.. मोबाईल काढला आणि व्हाट्सअप दैनंदिनी तपासत बसलो. " हं बोला साहेब" असा जरा स्पष्ट अन् आत्मविश्वास पुर्ण असा आवाज कानाच्या अगदी जवळच खणखनला. आवाज कंडक्टर साहेबांचा होता. अगदी चाळीशीतला सावळा वर्ण, अंग काडी व्यवस्थित, डोळ्याला चष्मा अन् मराठवाडी बोली. मी म्हटलं "द्या साहेब दहा टक्के.." लगेच आपल्या कर्तव्य पालनाचा दाखला देत "दाखवा कार्ड" असं म्हणाला. मी ही माझ्या हजरजवाबीपणे कार्ड दाखवलं. त्याने किरमीजे डोळे करून तपासलं अन् परत केलं. टिकीट टिकीट.... म्हणत तिकीटं काढत पुढे जात होता. तेवढ्यात एक व्यक्ती "एक वनफोर्थ द्या.!" असे म्हणला. तोच कंडेक्टरने त्याला पुर्णपणे न्याहाळत कार्ड ची मागणी केली. कार्ड पाहताच शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष त्या कंडेक्टरने त्या व्यक्तीला ते कार्डची वैधता संपली म्हणुन चांगलेच खडसावले.. आपली चुक सावरत त्याने "साहेब आत्ताच रिनिव्ह केले ते, डेट त्यांनी टाकली नसावी बहुतेक" असं बेकायदा उत्तर दिलं.. त्याचं हे उत्तर ऐकून "मला काय मुर्ख समजता काय तुम्ही..? कित्ती साफ खोटे बोलत आहात...! ह्या कार्डची वैधता संपली हे तुम्हाला माहित असतांना सुध्दा गेल्या काही दिवसांपासुन तुम्ही हे अपंगाचे कार्ड चालवत आहात.." आधीच जरा बिथरलेला तो ईसम चांगलाच गोंधळात पडला...क.क.क म म करित "साहेब... साहेब..." करित होता. कंडॅक्टर साहेबाचा पारा अधिकच चढला.. "कुठले अपंग आहात तुम्ही दाखवा पुरावा, चला दाखवा मेडीकल सर्टीफिकेट..... काय चालुगिरी लावलीय ही... शासनाला फसवताहात तुम्ही... ये कांबळे गाडी पोलीस स्टेशन ला घेरे ह्याला......." असं म्हटल्या बरोबर तो व्यक्ती पक्का तितरफितर झाला. "नाही साहेब राहू द्या,... जावू द्या,.. मला येणार्या स्टाप वरच उतरवुन द्या".... भितीमुळे त्याने आणखी एक चुकीची गड घालून पुन्हा चुक केली होती" त्यावर कंडेक्टर चांगलाच ओरडला "म्हणजे तुम्ही लगेच उतरून पुढच्या कंडेक्टरला फसवणार..! त्याने जर कार्ड तपासलं नाही तर जमलचं तुमचं.., ये कांबळे आता घेच गाडी पोलिस स्टेशनला.. काय समजतोस काय तु स्वतःला तुला लगेच पुढच्या स्टाॅप ला उतरायचे होते तर मग शेवटच्या स्टाॅप चे टिकीट का बरं काढले.?...420 मध्ये आत टाकायला लावील जास्त हुशारी करशील तर,..... चल आण ते कार्ड ईकडे जमाच करून घेतो.." असे म्हणुन ते कार्ड कंडेक्टरने जमा करून घेतले अन् त्याची पुर्ण टिकीट फाडली.. हा प्रसंग बसमधील सर्व प्रवासी अगदी मनोरंजनाच्या भावात पहात होते. प्रत्येकजण त्या खोटारड्याची फजिती होताहे म्हणुन त्या प्रकाराचा मनमुराद आनंद घेत होते. कुणी ते कार्ड बघत होते. तर कुणी त्यावर आपली अतिचानाक्ष वकिली टिप्पणी सोडत होते. तर कुणी त्याला वेड्यात काढत त्यावर हसत होते. पण मी माञ त्या कंडॅक्टरने दाखवलेली दक्षता व त्याची कामाप्रतीची निष्ठा बघत होतो. आणि मनोमन समाधान व्यक्त करत त्या कंडेक्टरला शाबासकी देत होतो. जे खरोखर अपंग आहेत. ज्यांना अजीबात दिसत नाही असे अधू पंगू व्यक्ती आहेत. त्यांच्याजवळ बरेचदा हे अपंगाचे प्रमाणपञ नसल्याने पुर्ण टिकीट काढतात. आणि हे खोटारडे, भ्रष्टाचारी लोकच ह्याचा जास्त फायदा घेतांना दिसुन येतात. शासनाच्या नियमांना पायदळी तुडवुन सुशिक्षित लोकांनीच नियमांची पायमल्ली करावी तिथे देशप्रगतीच्या काय अपेक्षा कराव्यात..!
माझा स्टाॅप आला आणि बसमधून उतरलो. सर्व प्रवासी उतरत होते. सोबत ते कंडेक्टरही उतरले. पण माझ्यातल्या माणसाला राहावल्या गेलं नाही. मी त्यांना भेटलो. आणि म्हटलं साहेब तुमचं काम पाहून खुप छान वाटलं. चांगल्या कामाची स्तुती केली पाहिजे हे माझे मी कर्तव्य समजतो म्हणुन आपल्याशी बोलावसं वाटलं. त्यांनाही खुप बरं वाटलं. शासन घेवो कींवा नाही घेवोत पण समाजानं चांगल्या कामाची दखल घेतली पाहिजे. तेंव्हाच काहीतरी बदल घडेल असं वाटते. त्या कर्तव्य दक्ष कंडेक्टर चे नाव होते सुनिल भाग्यवंत. बोलता बोलता मी माझा परिचय दिला आणि तेवढ्यात बस आली माझ्या पुढच्या स्टेशनची... अन् मी तसाच पुढे धावत धावत बस कडे गेलो......

No comments:
Post a Comment