माणुस म्हणुन जगुया थोडं
रोज पळापळ नि धडपड करुन सारी,
आयुष्याचे सहज कोडे उलगडले नाही !
वाट सुखाची कधी कटु तर असेल गोड,
चला गडेहो माणुस म्हणुन जगुया थोडं !!
परके करी घात तर आपले पाठी वार,
कोण कुणाचा असे सोबती खरा साथीदार !
निनावे ते नाते जरी बंधास नसावे तोडं,
चला गडेहो माणुस म्हणुन जगुया थोडं !!
भरकटलेल्या वाटसरूंना वाट दाखवू,
मरगळलेल्या मनी क्रांतीचा ज्वाला पेटवू !
भ्रष्ट माणवा अज्ञानींचे शोषण आता सोडं,
चला गडेहो माणुस म्हणुन जगुया थोडं !!
किशोर तळोकार ९६७३०६०७६२
No comments:
Post a Comment