Sunday, 5 February 2017

एकदा एका चांदणीने.. (बालकविता)

💠 एकदा एका चांदणीने..! 💠
            बालकविता
    -किशोर तळोकार ९६७३०६०७६२

एकदा एका चांदणीने,
फारच कमाल केली ।
झाडू लावला नभात,
भारीच धमाल झाली ।।

चंद्र तारे ग्रह सूर्य,
सभा झाली खगोलांची ।
प्रत्येकास सांगितले,
शपथ घ्या स्वच्छतेची ।।

खूप झाले ढग दाटी,
जमा कित्ती धूलिकण ।
पृथ्वीवरच्या लोकांनी,
केले खुप प्रदूषण ।।

निसर्गाला झाला दमा,
ऊन पाऊस बेताल ।
झाडे ना जगली तर,
होतील सारे बेहाल ।।

ओझोन झाला पातळ,
वाढले वायू विषारी ।
थांबवा अणूप्रयोग,
फोल ठरली हुशारी ।।

स्वच्छतेची कास धरू,
नियम सगळे पाळू ।
आकाश नि वसुंधरा,
सकल सुंदर करू ।।

💠🔹💠🔹💠🔹💠🔹💠🔹💠

No comments: