सत्ता
सत्तेची विश्वासर्हता,
कमजोर होत आहे..!
तो निवडून येणारा,
कामचोर होत आहे..!!
लोकशाहीत माणसे,
दंगेशाहीत गुंतली..!
मतदारांचे दलाल,
शिरजोर होत आहे..!!
जातीची माती खाऊन,
सर्वधर्म मानतो मी..!
विकासाचे नारे खोटे,
फक्त शोर होत आहे..!!
प्रचारातल्या यात्रेत,
स्वाभिमान हा दाबला..!
गाजर हातात देत,
नेता थोर होत आहे..!!
व्वा काय ही स्वातंत्र्यता,
गुलामी अत्तर आहे..!
सांभाळा ह्या नीती ला,
हल्लेखोर होत आहे..!!
-किशोर तळोकार ९६७३०६०७६२
यवतमाळ
दि २२/०२/१७
No comments:
Post a Comment